•’माझ्या शब्दांचा विपर्यास केला’, कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो; आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण
मुंबई :- महायुतीतील मंत्र्यांविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने केलेल्या आंदोलनानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करता येणार नाही,’ असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) गटाकडून जोरदार टीका झाल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे.
गायकवाड यांनी आज (12 ऑगस्ट 2025) स्पष्टीकरण देताना म्हटले की, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.” ते म्हणाले, “मी ‘उबाठाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही,’ असे म्हटले होते. परंतु, माध्यमांनी थेट बाळासाहेबांचे नाव घेतले.” बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी, ते सर्वांचे दैवत आणि बाप आहेत, असे सांगत त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना संजय गायकवाड यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “त्यांना काही काम राहिलेलं नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही,” असे विधान त्यांनी केले होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…