मुंबईठाणे
Trending

Sandeep Deshpande : ‘इंदुरी चाट’वरून मनसे नेते संदीप देशपांडे भाजपच्या निशाण्यावर

MNS VS BJP Social Media War : मराठी मुद्द्यावरून भाजप-मनसे यांच्यात सोशल मीडियावर वाद

मुंबई :- मराठी भाषा आणि भूमिपुत्रांना नोकरीत हक्क या मुद्द्यांवरून महाराष्ट्रात राजकीय भूमिका घेणारे मनसेचे प्रमुख नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आले आहेत. दादरमध्ये सुरू केलेल्या त्यांच्या ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या उपहारगृहामुळे त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.

भाजपची उपहासात्मक टीका

संदीप देशपांडे यांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या उपहारगृहाच्या नावावरून आणि त्यातील पदार्थांवरून भाजप कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत. ‘इंदुरी चाट’ हा पदार्थ मूळचा मध्य प्रदेशातील असल्यामुळे आणि त्यांच्या उपहारगृहातील कूकही परप्रांतीय असल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी देशपांडेंना धारेवर धरले आहे.

या ट्रोलिंगची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा देशपांडे यांनी प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यावर एका भाजप कार्यकर्त्याने उपहासात्मक पोस्ट लिहिली, ज्यात म्हटले, “या हॉटेलचा कूक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करणारे पण परप्रांतीय… यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही, आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतात.”

मराठी महापौर की महायुतीचा?

या ट्रोलिंगमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ‘महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा’ असे म्हणत राजकीय टोला लगावला आहे. तर, काहींनी राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा एकत्र फोटो वापरत ‘हमारे संदीप भय्या के दुकान मे अनेका हा’ असे हिंदीत लिहून त्यांची खिल्ली उडवली आहे.

याआधी मनसेने मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अनेकदा भाजपची कोंडी केली होती. आता भाजप कार्यकर्त्यांनी त्याच मराठी मुद्द्यावरून देशपांडेंवर पलटवार केला आहे. यामुळे सोशल मीडियावर मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0