मुंबई
Trending

Sanjay Gaikwad : “मी मारलं… पण चूक नव्हती!” — आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Gaikwad Latest News : “साऊथ इंडियन कँटिनवर टीका केली तर एवढं का बोला जाता?” विरोधकांवरही सडकून टीका

मुंबई : आमदार निवासातील शिळ्या अन्नाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कँटिन व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी आपल्या कृत्याचे समर्थन करत, “मी जे केलं ते बरोबरच होतं; माझा मार्ग चुकीचा असला तरी उद्देश योग्य होता,”असं ठामपणे म्हटलं आहे.

गायकवाड म्हणाले, “एफडीएने कँटिनचा परवाना रद्द केला, ते माझ्या कृतीमुळेच. माझी प्रतिक्रिया चूक नव्हती. शिळं, निकृष्ट अन्न लोकांना देणाऱ्या व्यवस्थापनावर कुणीही कारवाई केली नव्हती. मी केलं ते महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठीच.”

आमदार निवासातील शिळ्या अन्नावरून व्यवस्थापकाला मारहाण; गायकवाडांची बिनधास्त कबुली

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना त्यांनी दक्षिण भारतीय कँटिनधारकावर आणि विरोधकांवरही सडकून टीका केली. “कँटिनचा मालक दाक्षिणात्य आहे म्हणून विरोधकांना एवढा पुळका का आला? साऊथच्या लेडीजबार आणि डान्सबारमुळेच महाराष्ट्राची संस्कृती बिघडली,”अशा संतप्त शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

तसेच, मारहाण ही फार मोठी घटना नव्हती, ती “छोटीशी मारहाण होती, एनसी मॅटर आहे,” असं सांगत त्यांनी कायद्याचे ज्ञान असल्याचा दावाही केला. विधानसभा अध्यक्षांना भेटून आपली बाजू मांडली असून, लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. “जर माझी कृती चूक वाटत असेल तर मुख्यमंत्री जे दंड ठोठावतील, त्यासाठी मी तयार आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0