Sangali Latest News : प्रवचनातील वक्तव्यांवरून कर्नाटकमधील फिर्यादीचा आक्षेप; ‘राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल,’ स्वामींचा कर्नाटक सरकारवर ‘महापाप’ केल्याचा गंभीर आरोप; धार्मिक-राजकीय वातावरण तापले
सांगली :- कोल्हापूर येथील कणेरी मठाचे पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बिळूर येथील प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माच्या आरक्षणावरून स्वामींनी केलेल्या वक्तव्यांवर कर्नाटकमधील एका फिर्यादीने आक्षेप घेतला आहे. Sangali Latest News
मुळत: कर्नाटकमधील बसवन पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा आता जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. स्वामींचे 9 ऑक्टोबर 2025 रोजी बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्यातील वक्तव्यांमुळे द्वेषभावना पेरली जात असून, एकोप्याला धक्का पोहोचत आहे, असे फिर्यादी शंकरगौंड बिरादार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
स्वामींचा कर्नाटक सरकारवर पलटवार
गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर स्वामींनी एबीपी माझाशी बोलताना आपली तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी कर्नाटकात लिंगायत समाज तोडणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि सरकारवर कठोर टीका केली.
स्वामी म्हणाले की, कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचे ‘महापाप’ काही लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तसे करू नये, असे मी बोललो. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने ‘कुत्सितपणे’ जाऊन खोडसाळ तक्रार दाखल केली असून, हा गुन्हा केवळ राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला आहे.
समाजाला जोडण्याचे काम करण्याऐवजी, खोडसाळपणाने राजकारण केले जात आहे, असे म्हणत स्वामींनी आपल्या प्रवचनाचा उद्देश केवळ समाज जोडणे हाच होता, असे स्पष्ट केले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात आणि कर्नाटकात धार्मिक-राजकीय वातावरण तापले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…