Vilasrao Jagtap Regine : विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध
सांगली :- जतचे माजी आमदार विलासराव जगताप Vilasrao Jagtap यांनी भाजपचा राजीनामा Vilasrao Jagtap resigns BJP देत लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Election विशाल पाटील Vishal Patil यांचा प्रचार ताकदीने करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोमवारी जाहीर केला.
पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देउ नये असे जाहीर मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर तर केलाच, जत तालुक्यात जगताप यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद देत त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचार करण्यासाठी आज जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीतच जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राने राजीनामा सादर केला असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यासाठी व काँग्रेसचे विशाल पाटील यांचा प्रचार करून निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…