मुंबई

Sandip Deshpande : “भगतसिंह आज असते तर त्यांनी कोश्यारींनाच चोपले असते!”; संदीप देशपांडेंचा माजी राज्यपालांवर हल्लाबोल; मुंबईत ‘केबल’ घोटाळ्याचाही केला आरोप

Sandeep Deshpande On Koshari : कोश्यारींनी स्वतःचे नाव बदलावे; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसे आक्रमक आणि उबाठा गटाच्या नगरसेवकांना 1-1 कोटींच्या ऑफरचा खळबळजनक दावा

मुंबई | राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात, या भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी या टीकेचा समाचार घेताना कोश्यारींच्या नावावरूनच टोला लगावला. “क्रांतिकारक भगतसिंह आज असते तर त्यांनी या कोश्यारींना नक्कीच चोपले असते, कोश्यारींनी आधी आपले नाव बदलावे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील सिमेंट रस्ते आणि केबलचा काळाबाजार?

संदीप देशपांडे यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर मुंबई महापालिकेच्या कारभारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.

रस्त्यांचे दुहेरी खोदकाम: मुंबईत सिमेंटचे नवीन रस्ते बनवून पूर्ण होताच ते पुन्हा खोदले जात आहेत. हे काम कोणाच्या परवानगीने सुरू आहे? असा सवाल त्यांनी केला.

टाटा पॉवरला झुकते माप: बेस्टची केबल असताना टाटा पॉवरला रस्ते खोदण्याची परवानगी का देण्यात आली? 220 केव्ही इलेक्ट्रिक केबलच्या नावाखाली प्रत्यक्षात ‘ऑप्टिकल फायबर केबल’ का टाकल्या जात आहेत, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.

सुरक्षेचा प्रश्न: परवानगी नसताना भलत्याच केबल टाकणे हे धोकादायक आहे. “आज फायबर टाकले, उद्या जर कुणी बॉम्ब ठेवला तर त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल देशपांडे यांनी विचारला.

अधिकाऱ्यांची चौकशी आणि पालिकेचे नुकसान

केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून फक्त खड्डे भरण्याचे पैसे घेतले जातात, ज्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी मनसे करणार आहे. “प्रशासक राजवटीत लोकांना त्रास होत आहे आणि पालिकेला मात्र ‘ठणठण गोपाळ’ मिळत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊत आणि उबाठा गटावर गंभीर आरोप

संदीप देशपांडे यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे) गटावरही तोफ डागली. “मला मिळालेल्या माहितीनुसार, उबाठाच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. संजय राऊत यांनी मुद्दाम डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?” असा सवाल त्यांनी केला. चंद्रपुरातील भाजप-ठाकरे युतीचा संदर्भ देत, “तुमच्यासाठी ती रासलीला आणि इतरांसाठी कॅरेक्टर ढिला, असे राजकारण आता चालणार नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago