मुंबईठाणे
Trending

Sandip Deshpande : “कोत्या मनाकडून अपेक्षा नको!”; स्वीकृत नगरसेवकपदावरून मनसे-ठाकरे गटात ‘ठिणगी’; संदीप देशपांडेंचा बोचरा टोला

Sandip Deshpande On Thackeray Group : ठाकरे गटाकडून तीन नावांची निश्चिती, मनसेचा प्रस्ताव वाऱ्यावर; 25 फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचे समीकरण बदलल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक (Nominated Councilor) पदावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसेमध्ये उघडपणे वादाची ठिणगी पडली आहे. आपल्या कोट्यातील एक जागा मनसेला देण्याची विनंती ठाकरे गटाने धुडकावून लावल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता प्रखर शब्दांत टीका केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई महापालिकेत शिवसेना (UBT) कडे 65 नगरसेवकांचे संख्याबळ आहे, ज्या आधारावर त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करता येणार आहेत. मनसेने या तीनपैकी एक जागा आपल्या पक्षाला मिळावी, असा प्रस्ताव ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिला होता. मनसे नेत्यांनी यासाठी पाठपुरावा केला असता, “पक्षाध्यक्षांशी चर्चा करून कळवतो,” असे उत्तर त्यांना मिळाले. मात्र, आता ठाकरे गटाने स्वतःच्याच तीन उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते, ज्यामुळे मनसेच्या पदरी निराशा पडली आहे.

संदीप देशपांडेंचा ‘व्हॉट्सॲप’ वार

ठाकरे गटाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लिहिले की,”कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये.”थेट नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ‘कोत्या मनाचे’ म्हणत निशाणा साधला आहे. या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात मनसे आणि ठाकरे गटातील दरी अधिक रुंदावण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठाकरे गटाची ‘ती’ तीन नावे कोणती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी कोणालाही वाटा न देता आपल्याच तीन निष्ठावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

1.साईनाथ दुर्गे (युवासेना कोअर कमिटी सदस्य)

2.माधुरी मांजरेकर

3 कैलास पाठक

25 फेब्रुवारीला घोषणा

मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपकडे (रितू तावडे) गेल्यानंतर आता समित्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. स्वीकृत नगरसेवकांची नावे 25 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जाहीर केली जातील. युतीत निवडणूक लढलेल्या मनसेला शेवटपर्यंत संधी मिळेल अशी आशा होती, मात्र ठाकरे गटाच्या ठाम भूमिकेमुळे आता मनसेला महापालिकेत स्वीकृत जागेविनाच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0