मुंबई
Trending

Sandip Deshpande : “मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न; भाजपचा डाव उघडा पडलाय!” – संदीप देशपांडेंचा आरोप

Sandip Deshpande : “गुजरातींना मोकळं, मराठ्यांना अटक” – सरकारला परिणाम भोगावे लागतील, देशपांडेंचा इशारा

मुंबई | मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय व्यापाऱ्यांच्या राज ठाकरे विरोधी मोर्चाला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी परवानगी नाकारून मनसे पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामुळे वातावरण चिघळले असून, यामागे भाजपचा दबाव असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी केला आहे.

“उत्तर भारतीयांना मोर्चासाठी मोकळं मैदान आणि मराठी माणसाला अटक – हे आणीबाणीसारखं नाही तर काय?” असा सवाल करत देशपांडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काल मध्यरात्रीपासून मनसेचे अनेक पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, देशपांडे म्हणाले, “मोर्चा नक्की निघेल, सामान्य मराठी माणूसच याचे नेतृत्व करेल.”

“गुजराती व्यापाऱ्यांना मोकळं वाव, आणि मराठी कार्यकर्त्यांना गजाआड – सरकारने हे थांबवलं नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. पोलिसांची ही कारवाई दडपशाही असून, हे सर्व प्रकरण राजकीय दबावातून घडत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

देशपांडेंनी भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलं की, “महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करून बिहार निवडणुकीत फायदा घेण्याचे षड्यंत्र भाजप रचत आहे.” भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक भडकाऊ वक्तव्य करून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

“महाराष्ट्र आमच्यासाठी आईसमान आहे. ती अशांत करण्याचा कोणताही डाव यशस्वी होणार नाही. आम्ही भडकणार नाही, पण आवाज उठवत राहू,” असे म्हणत देशपांडे यांनी मनसेच्या आगामी भूमिकेची झलक दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0