मुंबई

Sandeep Naik : नवी मुंबईत ‘नाईक’ पुन्हा सक्रिय! संदीप नाईक यांची अखेर भाजपात घरवापसी; फडणवीसांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

•प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश; 15 जानेवारीच्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढली

नवी मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. नवी मुंबईतील प्रबळ नेते आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी शनिवारी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने संतापून राष्ट्रवादीत गेलेल्या नाईकांनी अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे.

मुख्यामंत्र्यांची भेट आणि जल्लोष

संदीप नाईक यांनी शनिवारी संध्याकाळी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. नाईक यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी समजताच नवी मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

पराभवानंतर राजकीय समीकरणे बदलली

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे जिल्हाध्यक्षपद सोडून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर ते पुन्हा भाजपात येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि नवी मुंबईच्या हितासाठी पुन्हा एकदा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

“नवी मुंबईच्या विकासासाठी भाजपाच सक्षम”

या प्रसंगी बोलताना संदीप नाईक म्हणाले, “माझा राजकीय प्रवास नेहमीच नवी मुंबईच्या विकासाभोवती राहिला आहे. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. नवी मुंबईकरांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी मी पुन्हा भाजपाशी जोडलो गेलो आहे.” त्यांनी यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही आभार मानले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago