MNS leader Sandeep Deshpande : उद्धव-राज एकत्र येणार? देशपांडेंच्या फोटोवरून चर्चेला नवा उधाण
मुंबई | राज्याच्या राजकारणात नवा रंग भरताना दिसतोय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. MNS leader Sandeep Deshpande या दोन्ही पक्षांचे नेते — ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — पुन्हा एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या एका साध्यासोप्या फोटोनेही या चर्चेला नवा वळण दिला आहे.
देशपांडे यांनी गुरुवारी एक फोटो पोस्ट केला, ज्यात ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक वाचताना दिसतात. “लपवण्यासारखे काहीच नाही” या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या या फोटोने सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचे वादळ उठवले आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडील एका मुलाखतीत, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भविष्यासाठी आपापसातील भांडणे क्षुल्लक ठरतात,” असे सांगत युतीसाठी खुले संकेत दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनीदेखील “वाद बाजूला ठेवायला मी तयार आहे, पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांचे स्वागत नाही,” असे परखड मत मांडले.
दरम्यान, देशपांडे यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक त्यांनी स्वतः विकत घेतले असून, “विकत घेतल्याने अभिप्राय देताना आपलेपणा आणि मोकळेपणा ठेवता येतो,” असे ते म्हणाले.
सध्याच्या या सूचक घडामोडींनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर नव्याने प्रकाश टाकला आहे. शिवसेना (ठाकरे) – मनसे युतीची शक्यता अधिक बळकट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…