क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

SamtaNagar Police : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघड! समतानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 4 लाखांचे दागिने हस्तगत

Kandivali SamtaNagar Police Latest News : पोयसरमधील घरफोडी प्रकरणी मुख्य आरोपी गजाआड; छताचा पत्रा उचकटून केला होता डल्ला; सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश

मुंबई l कांदिवली पूर्व येथील पोयसर भागात छताचा पत्रा उचकटून घरात शिरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात समतानगर पोलिसांना मोठे यश आले आहे. अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून चोरीला गेलेला 4 लाख 15 हजार रुपये किमतीचा संपूर्ण सोन्या-चांदीचा ऐवज हस्तगत केला आहे. Mumbai Kandivali Latest Robbery News

नेमकी घटना काय होती?

फिर्यादी उमेश रवींद्र रसाळा (रा. पोयसर) हे 19 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी कामानिमित्त बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून 4 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाचा फास घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा गुन्हा स्थानिक तरुण शुभम अजय शर्मा याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून शुभम याला पोयसर परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या शुभमने पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

संपूर्ण मुद्देमाल हस्तगत पोलिसांनी आरोपी शुभम शर्मा याच्याकडून चोरीला गेलेले सर्व 4 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. 20 जानेवारी रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली असून, पोलीस आता त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

या पथकाने केली यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त महेश चिमटे आणि सहाय्यक आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, गुन्हे निरीक्षक अजितसिंग राजपूत, सहाय्यक निरीक्षक योगेश राऊत आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0