मुंबई

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी जनतेला भेट! सप्टेंबरमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन

Samruddhi Mahamarg Latest News : मुंबई ते नागपूर दरम्यानचा हा समृद्धी महामार्ग 704 किमी लांबीचा आहे. त्याचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे हा 76 किमी आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी समृद्धी महामार्गाचा Samruddhi Mahamarg शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे. सप्टेंबर 2024 च्या शेवटच्या दिवसांमध्ये या टप्प्याचे उद्घाटन केले जाईल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे BalaSaheb Thackeray यांच्या नावाने हा महामार्ग ओळखला जातो.

मुंबई ते नागपूर दरम्यानचा हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे हा 76 किमी आहे. कोस्टल रोड, एमटीएचएल रोडनंतर सरकारच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन यंदा मुंबईत जाहीर करण्यात आले आहे. Samruddhi Mahamarg Latest Update

हा महामार्ग सध्या इगतपुरीपर्यंत सुरू आहे. इगतपुरी ते आमणे गावादरम्यान सुमारे 76 किलोमीटरच्या पट्ट्यात बांधकाम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यंदाच्या निवडणुकीपूर्वी त्याचे बांधकाम करून घेणार आहे. Samruddhi Mahamarg Latest Update

समृद्धी महामार्ग म्हणजेच नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्प हे देशभरातील चांगल्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे आणि ठोस पाऊल आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी असून सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून हा महामार्ग बांधण्यात येत आहे. हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे.हा महामार्ग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागातून जातो. या एक्स्प्रेस वेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील भागांसह राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. Samruddhi Mahamarg Latest Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0