Samruddhi Mahamarg : पुण्यातील प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. पुणे समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
पुणे :- पुणेकरांसाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. समृद्धी महामार्ग Samruddhi Mahamarg पुण्याला जोडण्याचा निर्णय शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या Cabinet Meeting बैठकीत घेतला आहे. या आराखड्यांतर्गत पुणे ते शिरूर दरम्यान 53 किमी लांबीचा सहास्तरीय उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला असून तो अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडेल.
नवीन उड्डाणपूल केसनांद गावातून सुरू होऊन शिरूरपर्यंत जाणार असून त्याच्या बांधकामासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, अहमदनगरमार्गे हा उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी रुपये लागतील आणि एकूण खर्च 9565 कोटी रुपये होईल. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या सुधारित मार्गांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग जो पूर्वी ‘एनएचएआय’ बांधणार होता, तो आता ‘एमएसआयडीसी’ अंतर्गत बांधला जाणार आहे.एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार हा प्रकल्प ‘एमएसआयडीसी’कडे सुपूर्द करण्यात आला असून आता त्यावर वेगाने काम सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, शिवाय या भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकासही नव्या उंचीवर जाईल.