Samna Agralekh : “सिंदूरातून सत्तेची ज्योत? — लष्करी कारवाईचं राजकारण!”सामनाचा अग्रलेख
Samna Agralekh Latest Update ; ऑपरेशन सिंदूर’चा सैनिकी शौर्यापेक्षा भाजपच्या राजकीय रणधुमाळीत जास्त वापर!
मुंबई :- देशभर दहशतवादाविरोधात असलेला रोष आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सैनिकी पराक्रमाचा अभिमान – हे सर्व आता एका नव्या वळणावर पोहोचले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील “माझ्या नसांत आता गरमागरम सिंदूर उसळतोय” या वाक्याने नवा राजकीय वाद पेटवला आहे. ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखात ही भाषा भावनिक उन्मादाला खतपाणी घालणारी आणि हिंदुत्वाच्या प्रतीकांवरून सत्ताप्राप्तीचा मार्ग शोधणारी असल्याची टीका केली आहे. Samna Agralekh Latest Update
मोदी हिंदुत्ववादी असतील तर सिंदूराचे सांस्कृतिक महत्त्व जाणून बोलायला हवे होते, असं अग्रलेखात म्हटलं आहे. सिंदूर हे स्त्रीच्या भांगेत शोभते; शरीरात गेले तर विष ठरते. ही उपमा वापरत अग्रलेखात मोदींना “हलाहल प्राशन करणारे शंकर नाहीत,” अशी उपरोधिक टीका करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचे कुंकू पुसले गेले, त्यांचा न्याय हा राष्ट्रासाठी संघर्षाचा मुद्दा आहे, पण भाजपने तो निवडणुकीसाठी प्रचाराचा झेंडा बनवला आहे. ‘सिंदूर यात्रा’, मोदींचा लष्करी गणवेशातील प्रचार आणि विरोधकांना सोडून थेट सैन्याचे श्रेय घेणे – यामुळे सरकारची संवेदनशीलता आणि नीतीमत्ता तपासली जात आहे.
2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही अशाच प्रकारे प्रचार करण्यात आला होता आणि आता त्याचीच पुनरावृत्ती सिंदूराच्या नावाने केली जात आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होतो — “शौर्य कोणाचं आणि श्रेय कोणाचं?”



