salman khan vs lawrence bishnoi
मुंबई, दि. २५ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
Salman Khan vs Lawrence Bishnoi News | बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील टशन नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यांच्यातील वादविवाद, धमक्या ऑनलाईन माध्यमांवर आवडीने वाचल्या जातात. आता लॉरेन्स बिश्नोई कडून वकिलामार्फत पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आल्याने सलमान खान सोबतच वाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
याबाबत फ्री प्रेस जर्नल (Free Press Journal) यांनी एक बातमी प्रकाशित केली आहे.
अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरात येथील साबरमती कारागृहात बंद आहे. त्याला सलमान खानच्या गॅलॅक्सि अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला आरोपी केले आहे.
२०२३ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने २६८ अन्वये एक आदेश काढून लॉरेन्स बिश्नोई याला एका वर्षासाठी साबरमती तुरुंगातून इतरत्र हलविण्यास मनाई आदेश काढले होते. ३० ऑगस्ट रोजी १ वर्ष पूर्ण झाला आहे.