Salman Khan Gets Another Death Threat As Mumbai Police Receives Rs 2 Crore Ransom Message : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ट्रॅफिक कंट्रोलला एक मेसेज आला ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.
ANI :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला Salman Khan पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. गेल्या मंगळवारी (29 ऑक्टोबर) ट्रॅफिक कंट्रोलला एक मेसेज आला होता ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानला धमकी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे . Mumbai Police Receives Rs 2 Crore Ransom Message जर पैसे मिळाले नाहीत तर सलमान खानला मारून टाकू, असेही मेसेज मध्ये म्हटले आहे. या संदर्भात वरळी पोलिसांनी भा.दं.वि कलम 354 (2), 308 (4) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल्स आणि मेसेज येत आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशातील नोएडा येथून धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस ब्रांदा येथून नोएडा येथे पोहोचले होते. 20 वर्षीय मोहम्मद तय्यब अन्सारी असे आरोपी तरुणाचे नाव आहे.मोहम्मद तय्यब हा दिल्लीचा रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने फोन करून झीशान सिद्दीकी आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सध्या पोलिसांनी त्याचा फोनही ताब्यात घेतला आहे. ज्याचा तपास सुरू आहे. पोलिस आता त्या फोनद्वारे सर्व कॉल डिटेल्स काढत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…