Salman Khan Galaxy Apartment : 3 पोलिस चौक्या, 100 पोलिस आणि बुलेटप्रूफ ‘भिंत’… सलमान खानचा अपार्टमेंट बनला किल्ला

Salman khan Galaxy Apartment Security News : सलमानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काचेची भिंत बसवली जात आहे. मंगळवारी एका बाजूला काचेची भिंत बसवण्यात आली. दुसऱ्या बाजूला बसविण्याचे कामही सुरू आहे. एवढेच नाही तर संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 7 हाय सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
मुंबई :- बॉलिवूडचा ‘दबंग’ खान Salman Khan House Security म्हणून ओळख असलेले सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता.त्याचवेळी मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या घराची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा सल्ला दिला होता. 14 एप्रिल 2024 रोजी लॉरेन्स गँगच्या गुप्ता आणि पाल या दोन नेमबाजांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता, ज्यानंतर त्याचे कुटुंब खूप घाबरले होते.
सलमान खानच्या घरी बुलेटप्रूफ काचेची सुरक्षा भिंत बांधली जात आहे. ईद, दिवाळी आणि वाढदिवसानिमित्त सलमान खान ज्या गॅलरीत उभा राहून त्याच्या शेकडो चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो त्या गॅलरीवर बुलेटप्रूफ काच लावण्यात येत आहे.एवढेच नाही तर संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 7 हाय सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. घराच्या खिडक्या बुलेटप्रुफ करण्यात आल्या आहेत.गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तीन पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यातील एक पोलिस चौकी सलमान खानच्या घराबाहेर आहे.एवढेच नाही तर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे 100 हून अधिक कर्मचारी नेहमीच तैनात असतील.