पनवेल जितिन शेट्टी : अभिनेता सलमान खानच्या पनवेल Salman Khan Panvel Farm house येथील शेतघराबाहेरील टेहळणी प्रकरणातील आरोपीला हरियाणातील पानिपत येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुखा असे या संशयित आरोपीचे नाव असून लॉरेन्स बिश्नोई Lawrence Bishnoi टोळीशी सुखा संबंधित आरोपी आहे. पानिपत येथील सेक्टर २९ मधील अनाज मंडी परिसरातील अभिनंदन हॉटेलमध्ये त्याला हरियाणा आणि
नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलिसांचे पथक लवकरच सुखाला पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करणार आहेत.
सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात सुखा हा मुख्य सूत्रधार होता. पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट उधळून अनेकांची धरपकड केली. मात्र त्यानंतर सुखा हा पोलिसांच्या भीतीने सतत पळत होता. दाढी व केस वाढवून तो वेषांतर करून हरियाणातील हॉटेलमध्ये राहत होता.