क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : डोंगरात लपले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

Pune Latest Crime News : बोपखेल खून प्रकरणातील दोघांना अटक; एक अल्पवयीन आरोपी ताब्यात

पुणे | बोपखेलमध्ये झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील Pune Murder दोन आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. खून केल्यानंतर हे आरोपी दिघी येथील डोंगरावर लपून बसले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अखेर हे आरोपी जेरबंद करण्यात यश आले. Pune Latest Crime News

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहन अरुण गायकवाड (21 वय) व माम्या ऊर्फ प्रतिक दौलत मोहोल (27 वय) असून ते दोघेही बोपखेलमधील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात विकास राजेश खरे (24 वय) या तरुणाचा खून करण्यात आला होता. नीरज राजेश खरे (27 वय) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी गणेशनगर, बोपखेल येथे आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत विकास खरे याचा निर्घृण खून केला होता. गुन्हा करून पळून गेलेले आरोपी डोंगरावर लपल्याची माहिती पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांना मिळाली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथकांची निर्मिती करून पोलिसांनी डोंगराला वेढा घातला.

पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजूंनी घेरलेल्या डोंगरात त्यांचा फास आवळला गेला आणि अखेर पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली.

दिघी पोलीस ठाणे Dighe Police Station या गुन्ह्याच्या तपासात असून, खूनामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0