Sakinaka Police Latest News : खात्रीशीर माहिती आणि शिताफीमुळे ठाण्यातून आरोपी जेरबंद; न्यायालयानं जाहीरनामा वॉरंट केले होते जारी
मुंबई :- बृहन्मुंबई पोलीस दलांतर्गत कार्यरत असलेल्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या Sakinaka Police News ‘पाहिजे व फरारी’ पथकाने तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या दोन आरोपींना अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. हे दोन्ही आरोपी ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली आणि भिवंडी परिसरात लपून बसले होते. Mumbai Police Latest News
अटक आणि कारवाई
साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत कलम 324,323,34 भादवि या गुन्ह्यातील हे दोन्ही आरोपी मा. न्यायालयाने ‘फरारी’ घोषित केले होते. तसेच, त्यांच्या विरोधात जाहीरनामा वॉरंट देखील जारी केले होते. Sakinaka Police Latest News
दिनांक 16 ऑक्टोबर रोजी साकीनाका पोलिसांच्या ‘पाहिजे व फरारी’ पथकाला गुप्त बातमीदारांकडून हे आरोपी ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेत्रा मुळे, पोलीस हवालदार सांडव आणि पोलीस हवालदार होळकर यांच्या पथकाने कासारवडवली येथे जाऊन आरोपींवर पाळत ठेवली. पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली. Sakinaka Police Latest Crime News
अटक आरोपींची नावे
1.दयाशंकर अदालत त्रिपाठी (वय 39), रा. कासारवडवली, जि. ठाणे.
2.महेंद्र बेकारू चौधरी (वय 43 ), रा. काल्हेर, भिवंडी, जि. ठाणे.
साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…