मुंबई

Sajay Raut : मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- ‘एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस गुलाम आहेत’, पीएम मोदी आणि अमित शहा…’

Sanjay Raut On Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे.

मुंबई :- शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut On Maharashtra CM यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री ठरवतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते गुलाम असल्याचे त्यांनी सांगितले.ही सगळी भाजपची कंपनी आहे, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना जे हवे ते होईल, माझ्या मते फक्त भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा, आकडेवारी भाजपकडे आहे, फक्त फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत.

तत्पूर्वी, संजय राऊत यांना विचारले असता, एवढ्या जागा जिंकणारे एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आहेत का? अजित पवार हे शरद पवारांपेक्षा ताकदवान आहेत का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही निवडणूक हरलो नाही. यात काहीतरी गडबड आहे.मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीच्या कलानंतर दोन तास काही जागांच्या आकड्यांनुसार महायुती आणि मविआ युती पुढे होती.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रला सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. जनतेला ही अपेक्षा नसली तरी आम्ही ही अपेक्षा ठेवली आहे. मुख्यमंत्री कोण आहे, हे शेवटी दिल्लीचे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचं ठरवतील, आमदार काय हा निर्णय घेणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, राज्यात कोण मुख्यमंत्री होणार यात मला रस नाही. आज 26 तारीख असून सरकारस्थापनेसाठी आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेच्या आज कार्यकाळ संपणार आहे. आमच्यावेळी राष्ट्रपती राजवटीची धमकी येत होती, पण आता वेगळा नियम असल्याचे सांगितल्या जात आहे. यावरुन तोच मुद्दा पुन्हा पुढे येतो की, राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित निर्माण करण्यासाठी संविधान निर्माण झाले. पण यांच्याकडे स्वतःसाठी सेगळा तर आमच्यासाठी वेगळा नियम आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago