Nalasopara Murder News : भररस्त्यात चाकूने वार करून केला होता खून; मुख्य आरोपीसह एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
नालासोपारा | नालासोपारा पूर्व येथील संतोष भवन परिसरात 16 डिसेंबर रोजी झालेल्या साहिल शेख या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपींना तुळींज पोलिसांनी नवी मुंबईतील उरण परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणी अरशद आबेद अली (वय 21) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. Nalasopra Latest Crime News
नेमकी घटना काय?
दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास संतोष भवन येथील दुर्गामाता मंदिराजवळ ही घटना घडली होती. आरोपींनी साहिल शेख याच्या पाठीत चाकूने वार करून त्याला जिवे ठार मारले. तसेच, या घटनेचा साक्षीदार अहमद रजा यालाही जिवे मारण्याची धमकी देऊन चाकूने मारहाण केली होती. याप्रकरणी फातिमा मन्सुरी यांच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात Tulij Police Station‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उरणमध्ये रचला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी उरण (नवी मुंबई) परिसरात लपल्याची माहिती मिळाली. तुळींज पोलिसांनी उरण पोलिसांच्या मदतीने शिताफीने सापळा रचून अरशद आबेद अली आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
आरोपींची रवानगी कोठडीत
मुख्य आरोपी अरशद आबेद अली याला 18 डिसेंबर रोजी अधिकृतपणे अटक करण्यात आली. तर, सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला भिवंडी येथील बाल न्यायालयाच्या आदेशानुसार बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या खुनामागचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
या पथकाने बजावली कामगिरी
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस हवालदार अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, दिगंबर परजने, श्रीधर कांबळे, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम आणि पथकातील इतर अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…