“साहेब मला माफ करा….”उद्धव ठाकरेंना मोठा झटका, जितेंद्र जानवले यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला

•उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. सोमवारी (17 फेब्रुवारी) वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानवले यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मुंबई :- उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. सोमवारी (17 फेब्रुवारी) वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवले यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आपल्या कार्यक्षेत्राबाहेर नेमणुका करून राजकीय नुकसान करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.
ठाकरे गटाला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मशाल घेऊन मातोश्रीवर आलेला कार्यकर्ता म्हणून जितेंद्र जानवळे यांची ओळख आहे. विभागप्रमुख अनिल परब यांनी त्यांना कामापासून दूर ठेवले, असे जानवले यांचे म्हणणे आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पक्षात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, त्यांच्या व्यथा मांडूनही पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. क्षमता असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.