मुंबई

Sahar Shaikh : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचा पोलिसांकडे लेखी माफीनामा; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रकरणावर पडदा

Mumbra Police On Sahar Shaikh : “तिरंग्यासाठी जगू आणि मरू”; किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कडक कारवाई; भविष्यात चिथावणीखोर भाषण केल्यास कारवाईचा इशारा

मुंब्रा l ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथून निवडून आलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत शेख यांनी माफी मागितल्याने हे प्रकरण आता दप्तरी नोंदवण्यात आले आहे.

काय होता वाद?

निवडणुकीतील विजयानंतर एका जाहीर सभेत भाषण करताना सहर शेख यांनी, “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे विधान केले होते. या विधानाचा संबंध ‘हिरवा रंग’ आणि धर्माशी जोडून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केले होते.

माफीनाम्यात काय म्हटले?

23 जानेवारी 2026 रोजी सहर शेख यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे आपला लेखी माफीनामा सोपवला. त्यात त्यांनी खालील खुलासे केले आहेत

“हरा कर देना है” हे वाक्य केवळ पक्षाचा झेंडा आणि निशाणीच्या (हिरवा रंग) संदर्भात होते. “आम्ही तिरंग्यासाठी जगणार आणि तिरंग्यासाठीच मरणार आहोत.” कोणाचेही मन दुखावण्याचा किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आपला हेतू नव्हता. तरीही वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागत आहे.

किरीट सोमय्यांची पोलिसांशी भेट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मागितला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सोमय्या यांना लेखी पत्राद्वारे सहर शेख यांच्या माफीनाम्याची माहिती दिली. पोलिसांनी स्पष्ट केले की, सध्या हा माफीनामा स्वीकारून हे प्रकरण थांबवण्यात आले आहे. मात्र, भविष्यात अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य पुन्हा केल्यास सहर शेख यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तजवीज पोलिसांनी ठेवली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

52 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago