क्राईम न्यूज

Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद

  • Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई

पुणे, दि. १२ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Vanraj Andekar Murder

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar हत्या प्रकरणात फरार असणारा गुन्हेगार सागर पवार याला जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तर साहिल दळवी याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

वनराज आंदेकर हत्येनंतर सागर पवार हा फरार झाला होता. आंदेकर टोळीतील सागर पवार हा महत्वाचा चेहरा होता. कोमकर, गायकवाड आणि सागर पवार यांच्यातील कनेक्शन पोलिसांनी तपासले आहेत. तपासामध्ये ३ पीस्टल व ३ जिवंत राऊंड जप्त केलेली आहे. आत्तापर्यंत एकूण ८ पिस्तल आणि १३ राऊंड, ७ दुचाकी, एक क्रेटा कार आजतागायत जप्त केली आहे. आरोपी संगम वाघमारे यास १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.

वनराज खून प्रकरणी आजतागायत ३ अल्पवयीन विधिसंघर्षित समवेत एकूण २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.

सदरची कारवाई युनिट १ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहाय्यक पोलीस फौजदार मकरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व निलेश साबळे यांनी केली.

Maharashtra Mirror

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago