क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Bhayandar Police News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीत 145 वाहनांवर केसेस दाखल

Mira Bhayandar Police Combing Operation News : मीरा- भाईंदर परिमंडळ-1 अंतर्गत ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी

मिरा रोड :- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे व मीरा-भाईंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या आदेशावरून मीरा-भाईंदर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात त्यात 28 मार्च सकाळी 10 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान काशिमीरा, काशिगाव, मिरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन सागरी पोलीस ठाण्यात ऑल आउट कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी दरम्यान अनेक कारवाई केल्या आहेत. Mira Bhayandar Police Combing Operation News

ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान 5 वॉरट मधील आरोपीत यांना अटक करण्यात आले, एन.डी.पी.एस. कायदयान्वये 4 केसेस करण्यात आल्या, 1 इसमावर सी.आर.पी.सी. 126 प्रमाणे व 2 इसमावर

सी.आर.पी.सी. 128 प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली, दारुबंदी कायद्यान्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले, 24 हिस्ट्रीशिटर तपासले, 7 गुंड आरोपी चेक केले, 1 विदेशी नागरीक तपासले, 5 तडीपार इसमाना तपासले असता 1 मिळून आल्याने त्याचेवर महा.पो.अधि. कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली, 65 हॉटेल व लॉजेस तपासले. पो. ठाणे हद्दीत लावण्यात आलेल्या नाकाबंदीत 346 वाहने तपासाली व 145 वाहनावर मो.वा. कायद्यान्वये कारवाई केली आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 102 अन्वये 10 कारवाई करण्यात आली, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाया 05 इसमावर कोप्ता अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0