Sadanand Date : केंद्र सरकारकडून ‘एनआयए’ प्रमुख दाते यांच्या महाराष्ट्रातील घरवापसीला हिरवा कंदील; 1 जानेवारीपासून सूत्रे हाती घेण्याची शक्यता
मुंबई | राज्याच्या पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च अशा ‘पोलीस महासंचालक’ (DGP) पदावर 1 जानेवारी 2026 पासून सदानंद दाते Sadanand Date यांची नियुक्ती होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) विद्यमान महासंचालक असलेल्या दाते यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठविण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेट समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याची सुरक्षा धुरा एका अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे जाणे निश्चित मानले जात आहे.
रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार!
राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला दोन वर्षांचा वाढीव कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी नवीन नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) पाठवली होती. यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार 1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचे नाव सर्वात वर आहे.
काही प्रमुख दावेदार आणि प्रक्रिया
UPSC कडून लवकरच 3 नावांची शिफारस राज्य शासनाला केली जाईल. त्यात दाते यांचे नाव निश्चित असल्याने शासन त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्यता आहे. दाते यांच्यासह या शर्यतीत खालील अधिकारी होते.
संजय वर्मा (महासंचालक, विधी व तांत्रिक)
रितेश कुमार (समादेशक, गृहरक्षक दल)
संजीवकुमार सिंघल (महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
अर्चना त्यागी (महासंचालक, गृहनिर्माण व कल्याण महामंडळ)
26/11 चा नायक आणि ‘फोर्स वन’चे पहिले प्रमुख
सदानंद दाते यांची ओळख एक अत्यंत कठोर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून आहे. त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे,
26/11 हल्ला: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते जखमी झाले होते.
फोर्स वन: दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘फोर्स वन’ या विशेष पथकाचे ते पहिले प्रमुख होते.
मुंबई गुन्हे शाखा प्रमुख, एटीएस (ATS) प्रमुख, आणि मीरा-भाईंदरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे.
दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता
सदानंद दाते हे डिसेंबर 2026 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यास त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो. दाते यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात शिस्त आणि दहशतवादविरोधी कारवायांना अधिक बळ मिळेल, अशी भावना गृहखात्यातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…