क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai News : “मोठ्या खुर्च्या अबाधित, खालच्या पातळीवरच फाशी – अँटी करप्शनच्या कारवायांचा उघड विरोधाभास”

महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप –
अँटी करप्शन ब्युरोच्या ACB Trap धडक कारवायांचा आवाज दरवेळी पोलिस ठाण्यांच्या भिंती ओलांडून जनता ऐकते. पण प्रत्येक वेळी जाळ्यात अडकतात तेच – कर्मचारी, हवालदार, वरिष्ठ निरीक्षक. धक्कादायक म्हणजे, संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे दिवसाढवळ्या सुरू असताना त्या विभागाचा सर्वोच्च अधिकारी – पोलीस आयुक्त – मात्र लोखंडी कवचात लपून सुरक्षित कसा राहतो, हा जनतेला जाळणारा प्रश्न बनला आहे. Mumbai Breaking News

अवैध धंद्यांचे जाळे पोलिसांच्या नकळत चालते, असा समज केवळ भोळ्यांना फसवणारा आहे. पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय मोठमोठ्या गोरखधंद्यांना श्वासही घेता येणार नाही, हे अगदी लहान मुलांनाही ठाऊक आहे. मग या सडलेल्या यंत्रणेची खरी सूत्रधार खुर्च्या मात्र का अगदी अभेद्य? Mumbai Police Will Take Action Against Corruption

जनतेच्या पैशावर पोसलेले, कायद्याचे रक्षक म्हणून शपथ घेतलेले हे वरिष्ठ अधिकारी जर या लाचखोरीच्या मेजवानीकडे डोळेझाक करत असतील, तर केवळ कनिष्ठांना अटक करून न्याय मिळतोय असे दाखवणे हा जनतेशी केला जाणारा उघड विश्वासघात आहे. Mumbai Latest Crime News

“मोठे मगर राजरोस पोहत राहतात, लहान मासे जाळ्यात तडफडतात” – अँटी करप्शनच्या कारवायांचा हा क्रूर विद्रूप चेहरा लोकांच्या डोळ्यांसमोर उभा आहे. प्रश्न सरळ आहे: जबाबदारी सगळ्यांची, मग शिक्षा फक्त खालच्या पातळीवरच का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0