Sada Sarvankar यांची Raj Thackeray यांना विनंती!
•माहीम विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना विनंती केली आहे की…
मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना विनंती केली आहे. 40 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत आहे. मी तीन वेळा घामाने आणि कष्टाने आमदार झालो आहे. बाळासाहेब असते तर मी माघार घेतली नसती अशा शब्दात ट्विट करत राज ठाकरे यांना सदा सरवणकर यांनी विनंती केली आहे. सदा सरवणकर यांच्या विरोधात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
सदा सरवणकर काय म्हणाले?
मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो.
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली.
ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते.
एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली.
राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.
आशिष शेलार यांनी जाहीर रित्या राज ठाकरे यांना पाठिंबा देव असे काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देणे हे महायुतीसाठी अडचणीचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत संकेत दिल्याचे म्हटले आहे.