Rural India’s Shame : The Lachkhor Scam by Gram Sevaks : ग्रामसेवक याने गाईचा गोठा बांधल्याचे बिल पासकरण्यासाठी ग्रामसेवकाकडेच मागितली लाच…
•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; दहा हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहात अटक केली आहे
छत्रपती संभाजीनगर :- वैजापूर तालुक्यातील राहेगाव ग्रामपंचायत इथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकानेच ग्रामसेवकाकडे लाच मागितली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. “Provocative Scandal : Gram Sevak Caught Red-Handed in Lach Scheme महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2023 24 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या गाय गोटा बांधल्यानंतर झालेल्या खर्चाची बिलाची मोजमापनाची पुस्तक आहे पास करण्यासाठी एकूण सात लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5000 प्रमाणे 35 हजार रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंत दहा हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. एसीबीने सापळा रचून ग्रामसेवकाला अटक केली आहे.
ग्रामसेवकाने ग्रामसेवकाच्या पतीकडे मागितले लाच
ग्रामसेवक अर्जुन गंगाधर खरबडे ( 44 वर्ष), ग्रामपंचायत राहेगाव,तालुका वैजापूर यांनी तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत राहेगाव येथील ग्राम पंचायत सदस्य असून त्यांच्या पतीकडे आणि इतर सहा लाभार्थी यांच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात मंजुर गायगोठा बांधल्यानंतर झालेल्या खर्चाची बिलाच्या मोजमाप पुस्तिका ( एम बी) वर सह्या करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी लाभार्थ्यांकडून पाच हजार रुपये असे एकूण 35 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती दहा हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. Gram Sevak’s Lachkhor Demand : A Case of Corruption? हे दहा हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवक अर्जुन गंगाधर खरबडे यांना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी एसीपी ने ग्रामसेवकांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईची प्रक्रिया चालू आहे.
एसीबी पथक
पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर, संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर, एसीबी छत्रपती संभाजीनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या सक्षम सापळा अधिकारी हरिदास डोळे पोलीस निरीक्षक लाचलुजपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर, सह सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक जाधवर यांनी पोलीस हवालदार साईनाथ तोडकर राजेंद्र जोशी पोलीस अंमलदार दैठणकर या पथकाने सापळा रचून लाचखोर ग्रामसेवकाला रंगेहात अटक केली आहे.