Rupali Thombare : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याकरिता सुचक ट्विट
Sushma Andhare on Rupali Thombare :रूपाली ठोंबरे पाटील पक्षांतर करणार का? सुषमा अंधारे यांच्या ट्विटचा अर्थ काय?
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे Rupali Thombare पाटील यांच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी सूचक ट्विट केले आहे. रूपालीताई अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे. रूपाली ठोंबरे पाटील हे पक्षांतर करणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या फुटी नंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचे साथ देत अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फायर ब्रँड नेत्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्त्या असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेविका आमदारकीचे उमेदवारी मिळालेले असे विविध महत्त्वाचे पद भूषवून रूपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीच्या फुटी नंतर त्यांनी अजित पवार यांची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना पक्षाने जबाबदारी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून रूपाली ठोंबरे पाटील हे पक्ष संदर्भात फार कमी भूमिका मांडताना दिसत आहे त्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी वेगळे चालले आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. त्यामध्येच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केलेले विधान रूपाली ठोंबरे पाटील पक्षा बदलीचा निर्णय घेणार आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
सुषमा अंधारे यांचे ट्विट?
निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार?…रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ… त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे.