पुणे

Rupali Patil Thombare : “मेधा कुलकर्णी या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!”

Rupali Patil Thombare On Megha Kulkarni : शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणी रुपाली ठोंबरे-पाटलांचा भाजप खासदारांवर हल्लाबोल; ‘त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा’ मागणी

पुणे :- पुण्यातील शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी नमाज पठण Pune Shaniwarwada केल्याच्या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादानंतर, भाजप खासदार मेधा कुलकर्णी Megha Kulkarni यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेल्या ‘शुद्धीकरण’ मोहिमेमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठण झालेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती शेणाने सारवली आणि शिववंदना केली होती.

या कृत्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना, आता महायुतीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

रुपाली ठोंबरेंची कडवट टीका

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर अत्यंत कडवट टीका केली. त्या म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.”

ठोंबरे-पाटील यांनी कुलकर्णी यांच्यावर थेट आरोप केला की, “त्यांच्या या नौटंकीमुळे पुण्यात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि समाजातील सामाजिक सलोखा बिघडतोय. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे.”

‘शनिवारवाडा बुरसटलेल्या बुद्धीचं प्रतीक नाही!’

रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या कृतीला ‘बेकायदेशीर’ ठरवले. त्या म्हणाल्या, “आपल्या धर्माचा स्वाभिमान असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणं वेगळं. ते करत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावत असतील, तर तो कायद्याने गुन्हा आहे. मेधा कुलकर्णी यांचं कृत्य बेकायदेशीर आहे.”

त्यांनी पुढे म्हटले की, “मेधा कुलकर्णी शिक्षिका असल्या तरी त्यांना ही गोष्ट माहीत नसेल की, शनिवारवाडा हे मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे. शनिवारवाडा मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या बुरसटलेल्या बुद्धीचं प्रतीक नाही.”

रुपाली ठोंबरे यांनी यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना तात्काळ समज द्यावी, अशी मागणीही केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago