•”अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं निधी आमचा!” रुपाली चाकणकर यांचा थेट दावा; तिजोरीचा मालक कुणी आणि चाव्या कुणाकडे? यावरून जनतेत संभ्रम!
पुणे :- राज्यात सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढत असताना, आता तिजोरीच्या चाव्या आणि मालकी हक्कावरून मोठे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. ‘लाडकी बहीण योजना’ असो वा तिजोरीचा निधी, प्रत्येक जण स्वतःचा दावा ठोकताना दिसत असल्याने, खऱ्या चाव्या कुणाकडे आहेत? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
या वादात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कुर्डूवाडीतील जाहीर सभेत थेट दावा केला की, “राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत. अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं निधी आमचा असेल.”
पवार, चाकणकर वि. चंद्रकांत पाटील
रुपाली चाकणकर यांचे हे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाच पुढचा भाग आहे. अजित पवार (जे राज्याचे अर्थमंत्रीही आहेत) यांनी नळदुर्ग येथील सभेत बोलताना, “माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करू शकतो,” असे स्पष्ट मत व्यक्त केले होते.
पवारांच्या याच पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली होती. पाटील यांनी गडहिंग्लजमधील प्रचारसभेत म्हटले होते की, “तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे.” तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका, असा विश्वास त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला होता.
‘निधी तुमचं, मत आमचं’ स्पर्धा
निधीशिवाय कोणतीही कामे होत नाहीत, हे स्पष्ट करत रुपाली चाकणकर यांनी कुर्डूवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले.
महायुतीतील या प्रमुख नेत्यांकडून तिजोरीवर आणि निधीवर वेगवेगळे दावे केले जात असल्याने, मतदारांमध्ये मात्र संभ्रम वाढला आहे. एक गट चाव्या आपल्याकडे असल्याचे सांगत आहे, तर दुसरा गट थेट मालकी हक्काचा दावा करत आहे. यामुळे महायुतीमधील हा ‘तिजोरीचा वाद’ आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…