Route March Of Mira Bhayander Police and Central Security Force : मिरा भाईंदर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे रूटमार्च
आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभुमीवर मिरा-भाईंदरमध्ये पोलीसांचे व केंद्रीय सुरक्षा बलाचे रुटमार्च
मिरा रोड :- आगामी लोकसभा निवडणुक 2024 साठी मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत मिराभाईंदर परिसरासाठी केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत कार्यरत असणारी केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बलाची 1 कंपनी दाखल झाली आहे. सदर कंपनीला मिरा भाईंदर परिसरातील मतदानक्षेत्राचे संपुर्ण परिस्थीतीची ओळख व्हावी, परिसरातील मतदान केंद्र, बुथ, मिश्र लोकवस्तीचे ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे यांची माहिती व्हावी व संवेदनशिल परिसराची माहिती व्हावी म्हणून 5 मार्च रोजी नवघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 11 ते 12.45 वाजेचे दरम्यान, भाईंदर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 4.00 ते 5.40 वाजेचे दरम्यान व नयानगर पो. ठाणे हद्दीमध्ये 7.00 ते 9.00 वाजेचे दरम्यान रुटमार्चचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्या मार्गावर रोड मार्ग काढण्यात आला?
नवघर पोलीस ठाणे हद्दीत स्व. मिनाताई ठाकरे हॉल, इंद्रलोक रामदेवपार्क रोड – क्विन्सपार्क – दिपक हॉस्पीटल रोड गोल्डन नेस्ट सर्कल न्यु गोल्डन नेस्ट हनुमान मंदीर जैन हॉस्पीटल पी.के. रोड- गुरुजी चौक इंद्रलोक फेस-४- स्व. मिनाताई ठाकरे हॉल, भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत झायका हॉटेल मॅक्सेस मॉल मांडवी तलाव-भाईंदर पो.स्टेशन- स्टेशन रोड-शिवसेना गल्ली-बॉम्बे मार्केट-६० फुट रोड-९० फुट रोड. तसेच नयानगर पोलीस ठाणे हद्दीत गोल्डन नेस्ट टिपु सुलतान-लोढाराड- नरेंद्र पार्क-शम्स चौकी-मिरारोड स्टेशन-शांतीनगर मार्केट-जैन मंदीर-रसाज सर्कल असे रुटमार्चचे आयोजन करण्यात आले होते.
रुटमार्चनंतर प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 यांनी केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बलाचे अधिकारी व जवान यांना मिराभाईंदर परिसराची व मिराभाईंदर मधील सध्याचे एकुणच परिस्थीतीची कल्पना देवुन आगामी लोकसभा निवडणुक 2024 चे बंदोबस्तसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बलाचे अधिकारी व जवान यांना राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 मिरा भाईंदर वसई विरार तसेच राजेद्र मोकाशे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, धिरज कोळी, प्रभारी अधिकारी, नवघर पो.ठाणे, सुर्यकांत नाईकवाडी, भाईंदर पो.ठाणे, विलास सुपे, नयानगर पो.ठाणे, देशमुख, पोलीस निरीक्षक, सी.आय.एस.एफ., नवघर पोलीस ठाणे, भाईंदर पो. ठाणे व नयानगर पो. ठाणेतील इतर पोलीस अधिकारी व 120 अंमलदार तसेच सी.आय.एस.एफ. कंपनीचे 70 जवान हजर होते.