रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना कृत्रिम हात व पाय वाटप शिबिर संपन्न
कळंब/धाराशिव(प्रतिनिधी) दि.२७/०५/२०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयपूर फूट व हात वितरण शिबिर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालया च्या सभागृहात पार पडले. या मध्ये 65 जणांना याचा मोफत लाभ मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्षस्थानी रोटरी क्लब चे अध्यक्ष रवी नारकर होते . सुरुवातीला रत्ननिधीच्या टीम प्रमुख गौरव परीट व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत रोटरी च्या वतीने करण्यात आले. दोन महिन्यापूर्वी मोजमाप घेण्यात आलेल्या लाभधारकांना यावेळी हात, पाय ,कुबड्या व कॅलीपर चे वाटप करण्यात आले. नैसर्गिक किंवा आपघातामुळे हात, पाय गमावण्यात आलेल्या रुग्णांना कृत्रिम हात व पाय वाटप करण्यात आले. बरेच लाभधारक येताना रिक्षा, गाडीने आले …पण जाताना मात्र स्वत:च्या पायाने चालत गेले…. दिवसभर चालेल्या या शिबिराचा लाभ 65 लाभधारकांनी घेतला.. अशा प्रकारचे शिबिर गेल्या 25 वर्षात प्रथमच घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रो डॉ रामकृष्ण लोंढे यांनी केले, सूत्र संचालन रो डॉ गिरीष कुलकर्णी यांनी केले तर आभार रो डॉ साजिद चाऊस यांनी मानले..
या प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून रो. संजय घुले तर को. चेअरमन म्हणून डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी रोटरीचे सर्व सदस्य व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
मी वैराग जिल्हा सोलापूर येथून शिबिरासाठी आलो. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी ने घेतलेल्या या शिबिरामुळे आम्हाला खरोखरच नवसंजीवनी तर मिळालीच पण दैनंदिक जीवनात अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणीचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे…
सुनील धोकटे
वैराग जि.सोलापूर.