मुंबई

Rotary Club Of Panvel : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल वनवासी आश्रम विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना

पनवेल : अंतर्गत सालाबाद प्रमाणे आज चिंचवली वनवासी कल्याण आश्रम येथील विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सदर तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांसह तेथील स्टाफची देखील तपासणी करण्यात आली.

क्लबचे वैद्यकीय संचालक डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय भगत, डॉ. नितीन म्हात्रे, डॉ. रमेश पटेल, डॉ. आमोद दिवेकर, डॉ. राजेश गांधी, डॉ. प्रसन्ना चंद्रात्रे, डॉ. मिलिंद घरत यांचे सह अनेट डॉ. ऐश्वर्या पवार व डॉ. अक्षता कचरे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून औषधोपचार केले तसेच दातांची निगा, मुखशुद्धी कशी राखायची याबद्दल डॉ. ऐश्वर्या यांनी मार्गदर्शन केले व डॉ. अक्षता यांनी शारीरिक तंदुरुस्ती कशी राखायची याचे मार्गदर्शन केले. सदर शिबिरास अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दिपक गडगे यांचे सह संचालक मंडळातील पदाधिकारी, अनेक क्लब सदस्य व ऍन्स उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0