मुंबई

Rotary Club of Panvel : श्री.पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलची भरघोस मदत

Rotary Club of Panvel Donated 20 lakh RS Donated : रोटरी क्लब ऑफ पनवेल ने सुपूर्द केला वीस लाखांचा धनादेश

पनवेल :- मातृदिनाचे औचित्य साधून येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलने Rotary Club of Panvel त्यांच्या अभिनव उपक्रमाला हातभार लावण्याच्या सजग हेतूने वीस लाखांची भरघोस मदत केली आहे. क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री.पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन मुनोथ यांच्यासह अन्य विश्वस्त मंडळींना धनादेश सुपूर्द केला. यावेळी समाजसेवक राजू सोनी, सतीश पावशे, श्याम जहागीरदार, संजीवनी मालवणकर, संतोष आंबवणे, यतीश सादराणि, संगीता कामाठी, आदींचे सह रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सदस्य तथा श्री. पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त तथा कार्यकर्ते, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. Rotary Club of Panvel News

श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या वतीने येथे दुग्ध उत्पन्न न देणाऱ्या ९५ गाईंची सेवा केली जाते. शेतकऱ्यांना उत्पन्न न देणाऱ्या जनावरांना शक्यतो ते कत्तलखान्यामध्ये विकतात. संस्थेच्या वतीने अशी जनावरे प्राप्त करून त्यांची सेवा केली जाते. तसेचआजारी जनावरांची शुश्रुषा केली जाते. कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे संस्थेला हे सजग कार्य करण्यासाठी समाज बांधवांकडून येणाऱ्या देणगी वर अवलंबून राहावे लागते. अशा प्रकारच्या जनावरांचा ओघ वाढता असल्यामुळे संस्थेला आता असलेली जागा अपुरी पडत आहे. येथे अतिरिक्त शेड बांधणे, जनावरांसाठी कायमस्वरूपी दवाखाना उभारणे, जनावरांचे गाई, बैल, आजारी जनावरे असे वर्गीकरण करण्यासाठी विविध शेड्स, त्यांचा चारा ठेवण्यासाठी एक भक्कम जागा अशी कामे भविष्यात करायची आहेत. तूर्तास संस्थेला दर महिना अडीच लाख इतका खर्च येतो आहे. भविष्यातील उपक्रम करण्यासाठी देखील अतिरिक्त पैशांची गरज संस्थेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर श्रीपांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेल ने वीस लाख रुपयांची मदत केल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. श्री. पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे कार्याची ओळख झाल्यानंतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या परीने देणगी जाहीर करत संस्थेचे मनोबल वाढविले. Rotary Club of Panvel News

आम्ही येथे उभारलेले काम हे एका प्रामाणिक हेतूने उभारलेले आहे. येथून आम्हाला कुठल्याही स्वरूपाचे अर्थार्जन होत नाही. पशु सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून ज्यांना ज्यांना आम्हाला मदत करायची आहे ते आम्हाला आर्थिक सहाय्य करू शकतात. आपले वाढदिवस लग्नाचे वाढदिवस स्मृती दिवस अन्य दिवस लक्षात ठेवण्यासाठी आपण येथे येऊन आपले कार्यक्रम करू शकता तसेच आम्हाला सहकार्य देखील करू शकता. रोटरी क्लब प्रमाणे अन्य सेवाभावी संस्थांनी देखील पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावे अशी मी विनंती करतो.
— नितीन मुनोथ
विश्वस्त,
श्री. पांजरपोळ गोरक्षण संस्था, पनवेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0