Rohit Sharma New Record: रोहित शर्माने केला विश्वविक्रम, असा करणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार

Rohit Sharma New Record: इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्माने शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
ICC T-20 World Cup :- रोहित शर्माच्या Rohit Sharma नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक T-20 World Cup2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडचा वाईट पद्धतीने पराभव केला. या सामन्यात रोहितने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंचा सामना करत 57 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाच T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय कर्णधार बनला Rohit Sharma New Record: आहे. एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. Rohit Sharma Set New Milestone in T20
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 2021 मध्ये 303 धावा केल्या होत्या. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 248 धावा केल्या आहेत. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने 2022 मध्ये 225 धावा केल्या होत्या. केन विल्यमसन 216 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. Rohit Sharma Set New Milestone in T20
T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 8 सामन्यात 281 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेडने ऑस्ट्रेलियासाठी दमदार फलंदाजी करत 7 सामन्यात 255 धावा केल्या आहेत. या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचाही टॉप 10 खेळाडूंमध्ये समावेश आहे. सूर्य ९व्या क्रमांकावर आहे. त्याने 7 सामन्यात 196 धावा केल्या आहेत.