सूर्यकुमार यादव याने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये 20 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याच्या बॉलिंगवर सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा अफलातून रिले कॅच घेतला
T20 World Cup-winning team With Rohit Sharma felicitation event at Vidhan Bhavan: सूर्यकुमार यादव याने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये 20 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याच्या बॉलिंगवर सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा अफलातून रिले कॅच घेतला
मुंबई :- विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात टीम इंडियातील team India या चारही खेळाडूंनी आपलं मनोगत आणि भावना व्यक्त केल्या. यावेळेस कॅप्टन रोहितने Rohit Sharma सूर्यकुमार यादव Suryakumarयाने सीमारेषेवर घेतलेल्या कॅचबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली. “हे यश काही आमच्या चौघांचं नाही, साऱ्या टीम इंडियाचं आहे. बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला आम्ही बसवला असता”, असं म्हणत रोहितने मिश्किल टोला लगावला. रोहितच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकला. सूर्याने मनोगत व्यक्त करताना त्या ऐतिहासिक कॅचबाबत व्यक्त झाला. “कॅच हातात बसला”, असं सूर्या म्हणाला. यावर बोलताना रोहितने ही प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“तुम्हा सर्वांना माझा मोठा नमस्कार. सीएम साहेब तुमचे धन्यवाद आम्हाला इथे बोलावलंत. तुम्हा सर्वांना येथे पाहून बरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की याआधी कधीच असा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे असं सर्व पाहून आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवलाय, हे पाहून मला आनंद झाला”, असं रोहितने म्हटलं. तसेच रोहितने मुंबईत 4 जुलै रोजी नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीसाठी मुंबईकर क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. रोहितने या चाहत्यांचे आभार मानले.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…