Rohit Pawar : तुम्ही कोणता संघर्ष करून कोणत्या “धरणा”तून “सिंचन”करून साम्राज्य उभे केले रोहित पवार यांचा सवाल
• Rohit Pawar यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर रोहित पवार यांनी आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई :- आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्याची मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यामधील मालमत्तेवर ईडीने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली. यावेळी ईडीने 50.20 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर सविस्तर भूमिका व्यक्त केली होती. माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी भाजपामध्ये जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी एक्स अकाऊंटवरून काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. Rohit Pawar
आमदार रोहित पवार यांचे एक्सवर ट्विट
युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने 800 कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? Rohit Pawar
माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय. हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही. Rohit Pawar
ईडीच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. Rohit Pawar