Rohit Pawar On Ram Shinde : रोहित पवार म्हणाले: ‘गुंडाला पळून जाण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी केली मदत; राम शिंदेंचे राजकीय संबंध उघड’
पुणे :- पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा लंडनला पळून गेला असतानाच, त्याचा आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये निलेश घायवळ हा राम शिंदे Ram Shinde यांच्या पाया पडताना आणि त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये भाषण करताना दिसत आहे.Maharashtra Political Latest News
या व्हिडीओच्या आधारे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी राम शिंदे Ram Shinde आणि गुंड निलेश घायवळ यांच्यात असलेले राजकीय संबंध समोर आल्याचा थेट आरोप केला आहे.
राम शिंदे यांच्या प्रचारात घायवळचे भाषण
व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये निलेश घायवळ हा राम शिंदे यांच्या एका प्रचारामध्ये भाषण करताना दिसत आहे. तो मतदारांना राम शिंदेंना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. “शिंदे साहेब आपले आहेत, ते कोणत्याही कामामध्ये आपल्यामागे उभे राहतील,” असे निलेश घायवळ व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
‘घायवळला पळून जाण्यास आमदारांची मदत’
गुंड निलेश घायवळला पळून जाण्यासाठी आमदारांनी मदत केल्याचा खळबळजनक आरोपही रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले की, संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी घायवळला मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
पळून जाण्याचा मार्ग: घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून पळून गेला. त्याला सोडायला कोण गेले याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
राजकीय वापर: राम शिंदेंनी बाजार समिती निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केला, असा आरोपही रोहित पवारांनी केला.
गृहराज्यमंत्र्यांवर दबाव: तसेच, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करण्याच्या निर्णयावर राम शिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचाच दबाव असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
गुंड घायवळचा भाऊही वादाच्या भोवऱ्यात
निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची घटना ताजी असतानाच, त्याचा भाऊ सचिन घायवळ याचे कारनामेही चर्चेत आले आहेत. सचिन घायवळचीही भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांचा नकारात्मक अहवाल डावलून त्याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले होते.
सचिन घायवळने गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पुणे पोलिसांनी परवाना नाकारल्यानंतर, थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज केला आणि कदम यांनीही त्याला परवाना देण्याचे आदेश दिले. मात्र, पुणे पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता हा परवाना देण्यास अद्याप नकार दिला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…