Rohit Pawar Tweet : आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट करत महायुतीवर साधला निशाणा, निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 25-25 कोटी दिल्याचा गंभीर आरोप

•राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत त्या व्हिडिओमध्ये पैशाचे डिग्ग दिसत आहे
मुंबई :- पुण्याच्या खेड व शिवा पूर परिसरात जप्त केलेल्या पैशांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार नेते रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओतून रोहित पवार यांनी महायुतीतील नेत्यांना निशाणा साधत प्रत्येक आमदाराला 25-25 कोटी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या व्हिडिओमध्ये रोहित पवार यांनी केजीएफ चित्रपटातील गाणे टाकत पैशाचं डिग्ग दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महत्त्वाच्या महामार्गावर तसेच अनेक रस्त्यांवर रात्रीची नाकाबंदी चालू असते या नाकाबद्ध दरम्यान पुण्याच्या खेड तालुक्यातील शिवापुर परिसरातील नाकाबंदी दरम्यान एका खाजगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. विधानसभा निवडणुकीची ही पहिली मोठी कारवाई केली असल्याचे म्हटले जाते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेत्या सुषमा अंधारे यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणाच ती गाडी शहाजी बापू पाटील यांची असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतली असून त्याची चौकशी चालू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार यांनी ट्विट करत महायुतीवर चांगलंच निशाणा साधला आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.
विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे.
कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!