मुंबई :- ठाकरे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आधी बेडरूममधील व्हिडीओ आणि आता नवी मुंबईतील एका मोठ्या जमीन घोटाळ्याप्रकरणी थेट रोहित पवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाटांचा या घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचा दावा केला असून, यासाठी त्यांनी सिडकोच्या अहवालाचा संदर्भही दिला आहे.
रोहित पवार यांनी सिडकोचा अहवाल वाचून दाखवताना म्हटले की, “या प्रकरणात विधी आणि न्याय विभागाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असा स्पष्ट उल्लेख खुद्द सिडकोच्या अहवालात आहे.” नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘बिवलकर कुटुंबाने खरेदी केलेल्या जमिनीचे हे प्रकरण आहे. माझ्याकडे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आहेत, ज्यात विधी आणि न्याय विभागाने दिलेला रिपोर्टही आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे.’ हे आरोप असे वेळी झाले आहेत, जेव्हा संजय शिरसाट आधीच अनेक वादांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यात पैशांच्या बॅग दिसल्याचा आरोप झाला होता.
याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या लिलावावरूनही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, ज्यात त्यांच्या मुलाचे नावही समोर आले होते. सध्याच्या या नव्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून अधिक जोर धरण्याची शक्यता आहे. याआधीच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी नेहमीच थेट उत्तर दिले आहे, त्यामुळे आता रोहित पवार यांच्या या नव्या आरोपांवर ते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधक हे प्रकरण अधिक उचलून धरण्याची दाट शक्यता असून, आगामी काळात राज्यातील राजकारण या मुद्द्यावरून आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…