पुणे

Rohit Pawar : अजितदादांच्या एक्झिटवरून रोहित पवारांचे खळबळजनक दावे; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

•नरेश अरोरा यांचे कंत्राट आणि ऐनवेळी बदललेला प्रवासाचा प्लॅन; घातपाताच्या संशयाने महाराष्ट्राच्या राजकारणात गजहब

पुणे :- अजित पवार यांचा 28 जानेवारीचा विमान प्रवास हा पूर्वयोजित नव्हता, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, दादांचा प्रवास कारने होणार होता. मात्र, 27 जानेवारीच्या रात्री काही ज्येष्ठ नेत्यांनी एका विशिष्ट फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी दादांना मुंबईत थांबवून ठेवले. प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याने आणि सुनील तटकरे स्वतः तिथे उशिरापर्यंत उपस्थित असल्याने दादांना निघण्यास विलंब झाला. हा उशीर झाला म्हणूनच दादांनी कारऐवजी विमानाने जाण्याचा ‘लास्ट मिनिट’ निर्णय घेतला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नरेश अरोरा आणि 100 कोटींचे कंत्राट

रोहित पवार यांनी या वादामागे आर्थिक कारणांचा संशय व्यक्त केला आहे. राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीला देण्यात आलेले शेकडो कोटींचे कंत्राट रद्द करण्याची भूमिका अजितदादांनी घेतली होती. 27 तारखेच्या बैठकीत या कंत्राटावरून दादा आणि काही बड्या नेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली होती. विशेष म्हणजे, ज्या सल्लागार कंपनीचे कंत्राट रद्द करण्यावरून हा वाद झाला, त्याच कंपनीने काही महिन्यांपूर्वी एक विमान विकत घेतल्याचा दावाही रोहित पवारांनी केला असून, हेच विमान या अपघातात तर नव्हते ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्लॅक बॉक्स आणि घातपाताचा संशय

विमान अपघाताच्या तांत्रिक तपासावरही रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ जर बंद आढळला, तर हा 100 टक्के घातपातच होता, यावर माझे शिक्कामोर्तब होईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. व्हीएसआर (VSR) कंपनीचा यापूर्वीचा रेकॉर्ड आणि वैमानिकाची ऐनवेळी झालेली बदली या गोष्टी योगायोग नसून एका मोठ्या कटाचा भाग असू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

चौकशीची मागणी आणि राजकीय अस्वस्थता

रोहित पवारांच्या या दाव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे मोठे नेते या चौकशीवर गप्प का आहेत, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतूनही विचारला जात आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago