Uncategorized

Rohit Pawar : “लाडकी सुपारी” योजनेचा सर्व छोट्या-मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांना फायदा… रोहित पवार यांचे ट्विट

MLA Rohit Pawar taunts MNS Chief Raj Thackeray: शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची लाडकी सुपारी योजना उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे, रोहित पवार यांचा रोख कोणाकडे?

मुंबई :- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट ट्विट केले आहे. MLA Rohit Pawar Taunt त्यामध्ये लाडकी सुपारी योजना असे म्हटले असून यामध्ये त्यांनी राज ठाकरे MNS Chief Raj Thackeray यांचे नाव न घेता मात्र त्यांच्या रोख कोणाकडे आहे.यातून स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडूनही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. रोहित पवारांचे ट्विट चांगलेच चर्चात आले आहे.

रोहित पवार यांचे काय ट्विट?

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात ‘लाडक्या खुर्चीच्या’ प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून 288 जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले असल्याचे कळत आहे .

रोहित पवार पुढे म्हणतात की,खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने लाडकी सुपारी योजना सुरु केली असली तरी ‘महाराष्ट्र प्रिय’ असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत, ही अपेक्षा आहे. असो! लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही हे मात्र निश्चित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0