Rohit Pawar On Ajit Pawar : सुनेत्रा काकींच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आमचाही बाहेरून पाठिंबा; सीसीटीव्ही फुटेज तपासा, विलीनीकरणाच्या चर्चेवर रोहित पवारांचे स्पष्ट भाष्य
मुंबई | अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींनी वेग घेतला असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक खळबळजनक दावे केले. “अजितदादा आणि आमच्यात गेल्या दीड वर्षात काय चर्चा झाली, याचे मेसेज आणि पुरावे माझ्या फोनमध्ये भरून आहेत,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 आमदारांनी आणि 33 संघटना प्रमुखांनी सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुचवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा काकींच्या नावाला पाठिंबा देणाऱ्या त्या 35 आमदारांचे मी आभार मानतो. आमचाही त्यांना बाहेरून पूर्ण पाठिंबा आहे.” या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा जवळ येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
विलीनीकरणाची चर्चा आणि ‘सीसीटीव्ही’चा पुरावा
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “आम्ही सध्या विलीनीकरणाची चर्चा थांबवली आहे. पण अजितदादा आम्हाला कितीवेळा भेटायचे, हे जाणून घ्यायचे असेल तर जयंत पाटील यांच्या घरासमोरील लोढा साहेबांच्या घराचे गेल्या दीड वर्षातील सीसीटीव्ही फुटेज तपासा,” असे आव्हान त्यांनी दिले. अजितदादा सत्तेबाहेर येऊन आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते का, यावर दादांशी सविस्तर चर्चा झाली होती, असा खुलासाही त्यांनी केला.
ब्लॅक बॉक्स आणि तपासावर संशय
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास हाच आमच्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी आवर्जून सांगितले. “विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला आहे आणि तो तपासासाठी परदेशात पाठवला जाणार आहे. सध्या आमच्यासाठी राजकारण दुय्यम असून अपघाताची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेवर टीका
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील काही नेते मुद्दाम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विरोध करत आहेत, जेणेकरून त्यांचे पक्षात महत्त्व टिकून राहील. तसेच नरहरी झिरवळ यांनी विलीनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना भीती घालण्यासाठीच मंत्रालयातील ‘तो’ प्रकार (एसीबी कारवाई) घडला नाही ना? असा संशयही रोहित पवारांनी व्यक्त केला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…