Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ बॉम्ब, थेट अजित पवार यांच्यावर आरोप

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट करत थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा व्हिडिओ ट्विट करत थेट उपमुख्यमंत्री आणि काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार काल मध्यरात्रीपासून बारामतीच्या वेगवेगळ्या विधानसभेत गावात पैसे वाटत असल्याबाबत सातत्याने व्हिडिओ शेअर करत आहे. आज सकाळपासूनच रोहित पवार यांनी व्हिडिओचा धडाका लावला आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कारखान्यातील कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ शेअर करत थेट अजित पवार यांच्यावरच नाही झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे नातलग असल्याचे रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात येत आहेत.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हणाले की,अजितदादा घ्या…..ED आणि CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ…आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका! असे प्रश्न उपस्थित करत थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.