मुंबई

Rohit pawar : मंत्री छगन भुजबळ यांनी लावलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी फेटाळले

Rohit pawar on Chhagan bhujbal agitation : छगन भुजबळ यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखविण्याचे दिले चॅलेंज ; आमदार रोहित पवार

मुंबई :- मंत्री छगन भुजबळ Chhagan bhujbal यांनी रोहित पवार Rohit pawar आणि राजेश टोपे Rajesh Tope यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे चॅलेंज छगन भुजबळ यांना दिले तसेच भुजबळांनी केलेले आरोप रोहित पवार यांनी फेटाळून लावले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

आदरणीय भुजबळ साहेब,
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे.

असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती.

मंत्री छगन भुजबळ यांचे आरोप

छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाच्या रोहित पवार व राजेश टोपे या दोन आमदारांवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला खतपाणी घातल्याचा आरोप केला होता. छगन भुजबळ म्हणाले होते की, आंतरवाली सराटीत दगडफेक व लाठीचार्जची घटना घडल्यानंतर मनोज जरांगे आंदोलन सोडून आपल्या घरी जाऊन झोपले होते. पण रोहित पवार व राजेश टोपे या दोघांनी मध्यरात्री 2 वाजता तिथे जाऊन त्यांना पुन्हा आंदोलनस्थळी आणून बसवले.त्यानंतर शरद पवार यांना तिथे नेले. त्यानंतर उद्धव ठाकरेही तिथे गेले. पवार व ठाकरे या दोघांनाही खरी वस्तुस्थिती माहिती नव्हती. हे दोन्ही नेते गेल्यामुळे लाठीचार्जची घटना मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचली. त्याचा फायदा मनोज जरांगेंना झाला. या संपूर्ण घटनेत या दोघांचा हात आहे असा तेथील लोकांचा आरोप आहे, असे छगन भुजबळ म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0