Rohit Pawar : अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले ; आमदार रोहित पवार
![NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari on Rohit Pawar](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/03/Ajit-Pawar-Group-On-Rohit-Pawar-780x470.webp)
•”आप”च्या पराभवाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून विश्लेषण
मुंबई :- दिल्लीत भाजप आणि एक हाती सत्ता प्राप्त केल्याच्या वाटेवर असताना पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी “आप”च्या पराभवाचे विश्लेषण करताना अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी भाजपाचा विजय हा काँग्रेस आणि आप या दोघांच्या इगो आणि अहंकाराच्या मुळेच झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना काँग्रेसला दोष दिला आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष शिसोदिया 700 मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना 7350 मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास 3400 मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4500 हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 11000 मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला 18000 मते मिळाली. 20 हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले,दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन इंडिया आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे.