Rohit Pawar : फुटीर अजित दादा मित्र मंडळ यांना न्यायालयाचा चपराक
•सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटांवर चांगल्याच प्रकारे टीका करण्यात आली आहे
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाला दिलेले चिन्ह चिन्हे आणि नाव याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जाहीर केले आहे यामध्ये अजित पवार गटाला घड्याळाचे चिन्ह वापरण्याकरिता न्यायालयाने मुभा दिली असून घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे असे जाहीर करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहे या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर चांगल्याच प्रकारे टीका करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी फुटेल अजितदादा मित्र मंडळाला न्यायालयाने चांगल्याप्रकारे चपराक दिला असल्याचे म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी सिगारेट पाकिटाची जाहिरातीचा उदाहरण देऊन अजित पवार गटावर टीका केली आहे. Rohit Pawar
आमदार रोहित पवार काय म्हणाले?
आदरणीय पवार साहेबांचं नाव न वापरण्याचं हमीपत्र देण्याचे आणि पक्ष व घड्याळ चिन्हाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने ते तात्पुरतं असल्याची जाहीरात देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने फुटीर ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याने या मंडळाची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी झालीय. एकतर भाजप वापरुन घेतंय आणि आता न्यायालयीन निकालाच्या अधिन राहून (अटी लागू) अशी अट खुद्द न्यायालयानेच घातल्याने या मंडळाच्या विश्वासार्हतेचा जाहीर पंचनामाच झालाय. आता या मंडळाला लोकसभेसाठी चार जागा तरी मिळतील की नाही, याची शंका आहेच पण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत यांच्या हातात घड्याळही राहणार नाही आणि त्यातली वेळही बदलून बारा वाजलेले असतील, यात शंका नाही. दुसरीकडं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाला तुतारी चिन्हावरच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढण्यास मान्यता देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून याबाबत न्यायालयाचे आभार! Rohit Pawar
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला जाहिरातीचा उदाहरण आणि टीका
घड्याळ तेच वेळ न्याय प्रविष्ट आहे जसे सिगरेट च्या पाकिटा वर विशेष सुचना लिहावी सिगरेट आरोग्यास हानी कारक आहे तेसेच अजित पवार गटाला घड्याळा खाली लिहावे लागेल हे चिन्ह सुप्रीम कोर्ट च्या अंतिम निकाल लागेल तो पर्येंत वापरू. Rohit Pawar
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पोपटाला तडफडत ठेवून दिले आहे; फक्त मरण जाहीर करायचे आहे. आज मा. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पाच महत्वाची निरीक्षणे नोंदविली. त्यातील पहिले निरीक्षण म्हणजे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव कायम ठेवण्यात आले. तुतारी हे पक्षचिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कायम असून महाराष्ट्रात इतर कोणालाही तुतारी हे पक्षचिन्ह वापरता येणार नाही, हेदेखील मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र हे अपूर्ण असल्याचे मा. न्यायालयाने म्हटले. प्रादेशिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राला मान्यता देता येणार नाही, असे सांगून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत सूचना न्यायालयाने केल्या. तसेच, जर अशा पद्धतीने लोक पक्ष बदलू लागले तर दहाव्या अनुसूचीचे काय करायचे? असा प्रश्न युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांना विचारला. सर्वात महत्वाचे म्हणजे, “तुम्हाला घड्याळ चिन्ह वापरता येईल. Rohit Pawar
घड्याळ चिन्ह मिळालेले नाही. ते चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय आहे, असे प्रत्येक पोस्टरवर लिहावे लागणार आहे.” असेदेखील मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणूनच मी म्हटले की पोपटाला तडफडत ठेवलं आहे. फक्त ते कधी मरतंय, याची वाट बघायची आहे. आजचा निकाल जरी घड्याळ चिन्ह देणारा असला तरी खाली जे लिहायचे आहे, “कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून” यावरून कोर्टाला कुठे तरी जाणवलं आहे की, हा सर्व खोटारडेपणा झालेला आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर कदाचित हे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच कोर्टाने निकाल राखून ठेवला. मात्र, कोर्टाने इशारा तर देऊनच टाकला आहे. Rohit Pawar